Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंजूर चारा छावण्या तीन दिवसात सुरू करा
ऐक्य समूह
Saturday, May 18, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 17 : माण तालुक्यातील चारा छावण्यांना मंजुरी असून सुध्दा छावण्या सुरु झालेल्या नाहीत. त्या चारा छावण्या येत्या तीन दिवसात सुरु करा, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी केल्या.
माण तालुक्यातील पिंगळी खुर्द व वडगाव येथील चारा छावणीस ना. शिवतारे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी चारा छावणी चालकांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि चारा छावणी चालक उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी चारा छावणीस मंजुरी दिल्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी चारा छावण्या सुरु करण्याचे आदेश लवकरात लवकर द्यावेत. मंजूर चारा छावणी चालक जर चारा छावणी सुरु करण्यास प्रतिसाद देत नसेल तर त्याला लेखी पत्र द्यावे. 
 छावणीतील जनावरांसाठी लांबून पाणी आणावे लागत असेल तर त्यांना जवळच्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन द्यावेत. जिल्ह्यातील सक्षम सहकारी बँका, साखर कारखाने, सक्षम पतसंस्था यांनी चारा छावणी सुरु करण्याबाबत पुढाकार घ्यावा. लवकरात लवकर मंजूर असलेल्या चारा छववण्या कशा सुरु होतील, यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी संवेदनशीलपणे काम करावे. आज मी चारा छावण्यात फिरलो असता महिलांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. या महिलांसाठी चारा छावणीमध्ये मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, अशा सूचनाही पालकमंत्री शिवतारे यांनी दिल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: