Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुडाळ येथून तेरा वर्षाच्या मुलाचे अपहरण
ऐक्य समूह
Saturday, May 18, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: re1
5कुडाळ, दि. 17 : इंदिरानगर कुडाळ येथील साहिल सचिन पवार या गोसावी समाजातील तेरा वर्षाच्या मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केले असल्याची फिर्याद त्याची आई सौ. शिल्पा सचिन पवार वय 32 हिने कुडाळ पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अपहृूत मुलगा साहिल याने नुकतीच सातवीची परीक्षा दिली आहे. शाळेला सुट्टी असल्याने तो घरीच होता. त्याच्या वडिलांनी दारूच्या नशेत त्याला मारहाण केल्याने तो कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. या पूर्वीही तो असाच दोन वेळा घरातून निघून गेला होता. परंतु दोन दिवसांनी घरी परत आला होता. आताही तो येईल म्हणून त्याची आई-वडिलांनी चार दिवस वाट पाहिली. तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली; परंतु त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे त्याचे काही अज्ञात कारणाने कोणी तरी अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आईने कुडाळ पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. अधिक तपास सपोनि नीळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूर्यकांत शिंदे करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: