Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
क्रिकेटवरून दोन गटात तुंबळ हाणामारी
ऐक्य समूह
Thursday, June 06, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: re1
13 जणांवर गुन्हा; एक जण गंभीर जखमी
5पाटण, दि.5: क्रिकेट सामन्यावरून युवकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेच्या परस्पर विरोधी तक्रारी पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी या घटनेतील 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. 4 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान क्रिकेट सामन्याच्या पैशावरून युवकांच्या दोन गटात बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. या घटनेत रोहित शिवाजी माथने याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.
दरम्यान, या घटनेची पाटण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील 13 जणांवर पाटण गुन्हा दाखल झाला आहे. रोहित शिवाजी माथणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रवींद्र आनंदा पवार, रा.नाडे, ओमकार पवार, रा. पाटण, प्रणव संपत शेजवळ, अक्षय पाटील, रा.सुळेवाडी, सागर आनंद पवार, सूरज प्रकाश चव्हाण, रा. नवारस्ता यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून यामध्ये सूरज चव्हाण याने क्रिकेट सामन्याच्या पैशावरून आपल्या डोक्यात लोखंडी गज मारून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर आनंदा कृष्णत पवार, रा.नवारस्ता याने दिलेल्या तक्रारीनुसार नवारस्ता येथील शिवशाही या हॉटेलमध्ये जेवत असताना विरोधी गटाकरून धराधरी आणि मारामारी झाली. यामध्ये दीड तोळ्याची सोन्याची चेन हरवल्याची तक्रार केली आहे. यामध्ये शिवाजी लक्ष्मण माथणे, रोहित शिवाजी माथणे,रवीद्र हंबीरराव डोगळे, सागर दिनकर माथणे, आकाश वसंत माथणे, रमेश विजय माथणे (सर्व रा.नवारस्ता (माथणेवाडी) ता. पाटण), सुनील देसाई (रा.मूळगाव, ता. पाटण) याच्या विरोधात पाटण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. आर. कोळी तपास करत आहेत.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत धरपकड
मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या तुंबळ हाणामारीमुळे बुधवारी दिवसभर नवारस्ता येथील वातावरण तणावपूर्ण होते.
 नवारस्ता येथे दिवसभर पोलिसांचा पिंजरा आणि पोलीस फौजफाटा होता. तक्रारीत दाखल झालेल्या संशयितांची पोलीस बुधवारी रात्री उशिरापर्यंत धरपकड करताना दिसत होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: