Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात रमजान ईद उत्साहात साजरी
ऐक्य समूह
Thursday, June 06, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 5 : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडवत सातार्‍यात आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील 23 मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केल्याची माहिती मुस्लीम मायनॉरिटी कौन्सिलद्वारे देण्यात आली.
आज बुधवारी सकाळपासूनच रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधवांना हिंदू बांधवांसह अन्य घटकांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. आज सकाळपासून एस.टी. स्टँड मशीद, बिलाल, करंजे मर्कज, खड्डा मशीद, पोवई नाका मशीद, सत्वशीलनगर, कोडोली, औद्योगिक वसाहत मशीद, मक्का मशीद, मदिना मशीद, ईदगाह मशीद, बेगम मशीद, शाही मशीद या मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले.     
मशीद परिसरामध्ये वाहनांसाठी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. ईदगाह मैदान येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रजमान ईद निमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: