Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंतप्रधानांकडून ‘निती’ आयोगाचे पुनर्गठन
ऐक्य समूह
Friday, June 07, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: na2
अमित शहांचा कार्यकारी सदस्य म्हणून समावेश
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला असून ‘निती’ आयोगाचे पुनर्गठन केले आहे. केंद्र सरकारसाठी ‘थिंक टँक’ म्हणून निती आयोग काम करत असल्याने आयोग अधिक सक्षम करण्यासाठी त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निती आयोगाचे अध्यक्ष असतील. राजीवकुमार हे उपाध्यक्षपदी कायम असतील तर गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंग, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा  यात कार्यकारी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वाणिज्य, उद्योग आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत आणि सांख्यिकी मंत्री राव इंद्रजितसिंह  यांचाही निती आयोगात विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश असेल. डीआरडीओचे माजी प्रमुख  व्ही. के. सारस्वत, रमेश चंद, डॉ. व्ही. के. पॉल यांचा सदस्य म्हणून पुन्हा समावेश करण्यात आला आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया‘ अर्थात ‘निती’ आयोगाची निर्मिती 2015 मध्ये करण्यात आली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 65 वर्षे जुना असलेला नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी ‘निती’ आयोगाची निर्मिती करण्यात आली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: