Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहावी परीक्षेचा आज निकाल
ऐक्य समूह
Saturday, June 08, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: mn4
5पुणे, दि. 7 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (शनिवार) दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या. त्या अफवांवरील पडदा आता उघडला आहे.
बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या (दि. 8) दुपारी एक वाजता दहावीचा निकाल पाहाता येणार आहे. ारहरीरीहीींरशर्वीलरींळेप.लेा, ारहीर्शीीश्रीं.पळल.ळप, ऊशशशषउश ारहरहीीललेरीव.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप. या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. हा निकाल एसएमएसद्वारेदेखील मिळवता येणार आहे. त्यासाठी इडछङ द्वारे चकडडउ ीरिलश ीशरींपे हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा, अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून 17  लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉटस्अ‍ॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता राज्य बोर्डाकडून दाहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षाही दहावीचा निकाल 8 जून रोजी लागला होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: