Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
13 हजार रुपयांची लाच घेताना परिरक्षण भूमापक जाळ्यात
ऐक्य समूह
Saturday, June 08, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 7 : भूखंड एकत्रीकरण करण्याचे काम करून देण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेताना कराड येथील भूमापक कार्यालयातील परिरक्षक भूमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी, आनंदराव विठ्ठल माने ( वय 35) रा. नडवळ, ता. खटाव हे कराड येथील भूमापन कार्यालयात परिरक्षण भूमापक म्हणून कामकाज पाहतात. त्यांनी तक्रारदाराला सोमवार पेठ कराड येथील न. भू. क्रमांक 168/ 168/1 व 168/2 भूखंड एकत्रीकरण करण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती तक्रारदाराने 13 हजार रुपये लाच देण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे पोलीस अधीक्षक अशोक शिर्के, पोलीस हवालदार साळुंखे, पोलीस नाईक राजे, पोलीस शिपाई काटकर, भोसले यांनी सापळा लावला असता तक्रारदाराकडून 13 हजार रुपयांची लाच घेताना आनंदराव विठ्ठल माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: