Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर नरेंद्र पाटील यांची अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती
ऐक्य समूह
Tuesday, June 11, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि. 10 : लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून जोरदार लढाई लढलेले नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळावर अध्यक्ष म्हणून पुन्हा  एकदा नियुक्ती केली आहे. लोकसभा उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभे असताना ते महा-मंडळाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त उपस्थितीत कोल्हापूर येथे त्यांनी शिवबंधन धारण केले आणि सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या रुपात असणारा तगडा विरोधी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जाणारा सातारा मतदारसंघात, त्यांनी लढलेली निवडणुकीची लढाई सातार्‍यात चर्चेचा विषय झाली. मागील निवडणुकीत कित्येक लाखात असणारे श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य लाख सव्वालाख मतापर्यंत त्यांनी खाली आणले.
त्याचा परिणाम म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.           
तसे परिपत्रक सोमवार महाराष्ट्र शासनाने काढले आहे. महामंडळावर पुन्हा अध्यक्ष म्हणून वर्णी लागल्यावर जिल्ह्याच्या राजकारणात अजून सक्रियपणे काम करण्याचा त्यांचा मानस राहील हे उघड आहे.
मराठा युवकांच्या महामंडळ सदैव पाठीशी 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी सातारा जिल्ह्यात
महायुती जास्तीत जास्त मजबूत होऊन, मराठा युवकांच्या रोजगारासाठी महामंडळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशा पद्धतीने पुढील काळात काम होईल, अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी यानिमित्ताने दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: