Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
ऐक्य समूह
Tuesday, June 11, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: re3
कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार सोहळा; शेतकरी मेळाव्याचेही आयोजन
5कराड, दि. 10 : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याचे अनावरण गुरुवार, दि. 13 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 2.30 वाजता होणार आहे. यानिमित्ताने कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या युवा पिढीला मिळावी आणि त्यांच्या विचारांचे चिरंतन स्मरण व्हावे, या उद्देशाने कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाने महाविद्यालयाच्या प्रांगणात छ. शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सोहळ्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष   नरेंद्र पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील,  आ. पृथ्वीराज देशमुख,  आ. शंभूराज देसाई, आ. शिवाजीराव नाईक, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले, भीमराव पाटील, सांगली जि. प.चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, अर्बनचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, म्हाडाचे संचालक मोहनराव जाधव, जि. प. सदस्य मनोज घोरपडे, सागर शिवदास, सौ. प्रियांका ठावरे, सौ. शामबाला घोडके, सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक पवार, भरत पाटील, युवा नेते सम्राट महाडिक, शेतीमित्र अशोकराव थोरात, वर्धन अ‍ॅग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 या मेळाव्यास कृष्णा कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर जाधव यांनी केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: