Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोलेरोच्या धडकेत आई व मुलगी ठार
ऐक्य समूह
Tuesday, June 11, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 10 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जखिणवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत बोलेरो जीपने जोराची धडक दिल्याने रस्ता ओलांडणार्‍या सुमित्रा तुकाराम वाईकर व धरती तुकाराम वाईकर या मायलेकी जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. दरम्यान, या दोघींना धडक दिल्यानंतर बोलेरो गाडीने दुचाकीलाही धडक दिल्यानेही अरुण सावंत हे जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुमित्रा तुकाराम वाईकर व धरती तुकाराम वाईकर या जखिणवाडी गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना त्यांना महिंद्रा बोलेरो जीपने (एचएच-09-बीई-2000) जोराची धडक दिली. त्यात दोघीही जागीच ठार झाल्या. बोलेरेने मोटारसायकलीसही धडक दिल्यानेही अरुण सावंत हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: