Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माण तालुक्यात विद्यार्थिनीवर बलात्कार
ऐक्य समूह
Wednesday, July 03, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: re1
5म्हसवड, दि. 2 : माण तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पाचवीमध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने मोटारसायकलवर लिफ्ट देऊन ओसाड माळरानात नेऊन जबरी संभोग केला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या बाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दहा वर्षांची पीडित मुलगी पाचवीत शिकत असून तिची लहान बहीण (वय 8) ही तिसरीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहे तर सहा वर्षाचा भाऊ पहिलीच्या वर्गात शिकत आहे. 1 जुलै रोजी तिघे बहीण, भाऊ नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत आली.  
पीडित मुलीने आपल्या दोघा बहीण भावाला शाळेत सोडून स्वत: हायस्कूलमध्ये गेली. सायंकाळी 5.30 वाजता शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी लहान भाऊ व बहिणीला घेऊन शाळेपासून 4 कि.मी. अंतरावर असलेल्या घरी जाण्यासाठी चालत निघाली होती. दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप असल्याने रस्त्याने चालत जाताना घराच्या दिशेने जाणार्‍या मोटरसायकलस्वारास हात करून लिप्ट मागत होती. या वेळी काळ्या रंगाची  मोटरसायकल थांबली. तिन्ही मुलांना गाडीवर बसवून तो रस्त्याने घराच्या दिशेने निघाला होता. घर जवळ आल्यानंतर गाडी उभी न करता त्याने ओसाड माळरानात असलेल्या मंदिराजवळ गाडी थांबवली. त्याने दोघांना गाडी जवळ थांबवून तो पीडित मुलीस लांब असलेल्या झाडाकडे जाऊ लागता. पीडितेचा भाऊ तिकडे गेला असता नराधमाने त्याला चापट मारली व तो पीडितेला घेऊन पुढे गेला. त्यानंतर त्याने पीडित मुलीवर अत्याचार करून ही बाब कुणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी  दिली. त्यानंतर या मुलांना परत घरापासून काही अंतरावर सोडून त्याने पलायन केले. माण तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पीडित मुलीचे आई-वडील हे योजनांवर कामाला गेले होते. ते घरी आल्यावर त्यांना मुलीने घडलेली हकिकत सांगितली. त्यानंतर वडिलांनी या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी घटनास्थळी भेट दिली.  सपोनि. एम. बी. देशमुख तपास करत आहेत.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: