Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील युवकांकडून जिल्हा रुग्णालयात धुडगूस, गणेश देवकुळे यास अटक
ऐक्य समूह
Saturday, July 06, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 5 : येथील सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात मौलाली डोंगरे व प्रकाश कांबळे यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्यावर उपचार करु न देता डॉक्टरांना शिवीगाळ, धकाबुक्की करत हॉस्पिटलचे नुकसान केल्या प्रकरणी लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील युवकांनी रुग्णालयात धुडगुस घातला. या प्रकरणी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पितळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणी गणेश देवकुळे यास अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 3 रोजी सदरबझार परिसरात झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर जखमी झालेल्या मौलाली डोंगरे व प्रकाश कांबळे यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.   
यावेळी रात्री 9.30 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात येवून विशाल भिसे, विक्रम साठे, गणेश देवकुळे व इतर 5 ते 6 इसमांनी रुग्णांवर उपचार करु न देता डॉक्टर्सना धक्काबुक्की व शिवीगाळ करत गोंधळ घातला. यावेळी या संशयित आरोपींनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने तेथे जावून हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. तक्रारीनंतर पोलिसांनी यातील आरोपी गणेश देवकुळे यास अटक केली आरोपींवर सरकारी कामात अडथळा, वैद्यकीय सेवा व्यक्ती यांच्याशी हिंसक कृत्य, रुग्णालयाची तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कदम या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: