Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना परिसरात 3 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re1
5पाटण, दि. 10 : चिपळूण, अलोरे व कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्यात मंगळवार, दि. 10 रोजी रात्री 9.48 मिनिटांनी 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरणास कोणताही धोका नसल्याची माहिती धरण व्यवस्थापन सूत्रांकडून देण्यात आली.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या भिंतीपासून 12.8 किलोमीटर अतंरावर वारणा खोर्‍यात चांदोलीच्या पश्‍चिमेस 8 कि. मी. अंतरावर होता तर भूकंपाची खोली भूगर्भात 6 किलोमीटर अंतरावर होती. या भूकंपाच्या धक्क्याने तालुक्यात कोठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून धरणास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: