Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 :मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 9 रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान पोवई नाका येथून मुंबईला जाताना पिरवाडी सेवारस्त्याच्या कडेला स्वप्निल सुभाष कुंभार (वय 33), रा. रघुनाथपुरा, करंजे पेठ, सातारा त्याने मद्यप्राशन करून सार्वजनिक रस्त्यावर  आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मधुकर अशोक हिडे यांनी त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून स्वप्नील कुंभार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: