Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मिरढे येथे स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळला
ऐक्य समूह
Friday, July 12, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 11 : सर्दी पडसे त्यातून न्यूमोनिया उदभवल्याच्या निदानानंतर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अधिक उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला स्वाईन फ्ल्यू असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात अधिक उपचार करण्यात येत आहेत.
मिरढे, ता. फलटण येथील प्रकाश बबन काशीद (वय 38) असे स्वाईन फ्ल्यू झालेल्या रुग्णाचे नाव असून त्याला अधिक उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर त्यादृष्टीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून मिरढेप्रमाणे साखरवाडी येथे संशयित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधक उपाययोजना, जनजागृती प्रबोधन, प्रतिबंधक गोळ्या सुरू करण्याबाबत सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या असल्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदाळे यांनी सांगितले आहे.
 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: