Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज
ऐक्य समूह
Friday, July 12, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: mn2
5पंढरपूर, दि. 11 (प्रतिनिधी) : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वरांची पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे. शेवटचे संयुक्त रिंगणही पार पडले आहे. राज्यभरातून पंढरीच्या दिशेने निघालेले वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. पांडुरंगाचे दर्शन व्हावे हीच सर्व वारकर्‍यांची इच्छा असते. त्यामुळे अवघी पंढरी वारकर्‍यांनी गजबजलेली पाहायला मिळत आहे.मात्र विठुरायाच्या दर्शनाची रांग तब्बल 7 किलोमीटर अंतरावर पोहोचली असून भाविकांना देवाच्या पायाजवळ पोहचायला 30 तासांचा अवधी लागणार आहे.
यंदा राज्यातील अनेक भागात समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने आषाढीला विक्रमी गर्दीचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. विठ्ठल भक्तांची रांग सात कि.मी.वर पोहोचली आहे. महिनाभर विविध पालख्यात चालत आलेल्या भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे, 
मात्र कोणताही थकवा त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नाही. फक्त विठुरायाच्या पायावर मस्तक ठेऊन दर्शन घेण्याची भावना लहान- थोरांची दिसून येत आहे. पंढरपुरात काल पावसाचे आगमन झाल्याने भाविक सुखावला आहे. दर्शन रांगेत मंदिर प्रशासनाने 25 लाख लीटर मिनरल वॉटर वाटपास सुरुवात केली असून यंदाचा दर्शन मंडप वॉटरप्रूफ करण्यात आल्याने भाविकांना पावसाचा त्रास जाणवत नाही. दर्शन रांगेत यंदा दोन प्रकारची कार्पेट टाकल्याने भाविकांच्या पायाला त्रासही जाणवत नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: