Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सोनगावमध्ये जबरी चोरी; एकाला मारहाण
ऐक्य समूह
Friday, July 12, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 11 : सोनगाव, ता. सातारा येथे 6 ते 7 जणांच्या अज्ञात टोळीने तीन ठिकाणी जबरी चोरी करून 23 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी यावेळी प्रतीक शिंदे याला कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 11 रोजी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास सोनगाव, ता. सातारा   येथील अर्चना नारायण शिंदे या महिलेला लाकडी दांडके व कोयत्याचा धाक दाखवून तिच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे मणी मंगळसूत्र हिसकावून घेतले. यावेळी त्यांनी तिचा मुलगा प्रतीक शिंदे याला कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली.  नंतर चोरट्यांनी सुरज अमृत शिंदे यांच्या घरातील 6 हजार रुपये किमतीच्या साखरेसह 2 हजार रुपये लंपास केले. विकास पांडुरंग शिंदे यांच्या घरातून 1 हजार रुपये असे एकूण 23 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला. अर्चना शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: