Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

धोनीचे संघातील स्थान येत्या शुक्रवारी ठरणार
ऐक्य समूह
Tuesday, July 16, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: sp2
5लंडन, दि. 15 (वृत्तसंस्था) : विश्‍वचषकातील पराभवानंतर आता भारतीय संघामध्ये काही बदल होतील, असे म्हटले जात आहे. न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल, असे काही जणांना वाटले होते. पण आता भारतीय संघात धोनीचे स्थान आहे की नाही, हे येत्या शुक्रवारी कळणार आहे.
यंदाच्या विश्‍वचषकात धोनीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे वाढत्या वयानुसार धोनीने निवृत्ती घ्यावी, असे काही जणांनी म्हटले होते. आता भारताचा संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यातून कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी माघार घेतली आहे. पण या संघात धोनीचा समावेश होणार की नाही, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींबरोबरच धोनीप्रेमींना लागून राहिली आहे.
वेस्ट इंडिजच्या दौर्‍यासाठी संघ निवडण्यासाठी मुंबईमध्ये शुक्रवारी बैठक होणार आहे. निवड समितीची ही बैठक बीसीसीआयच्या मुख्यालयात होणार आहे. यावेळी वेस्ट इंडिजच्या दौर्‍यासाठी संघ निवडण्यात येणार आहे. या संघ निवडीमध्ये धोनीचे भवितव्य समजू शकणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: