Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित; आयसीसीची धडक कारवाई
ऐक्य समूह
Saturday, July 20, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: sp2
5लंडन, दि. 19 (वृत्तसंस्था) ः झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड व संघाचे तत्काळ प्रभावाने निलंबन करत असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केली.
आयसीसीच्या वार्षिक बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. माहितीनूसार, लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने व क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक घेण्यात झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड अपयशी ठरले. तसेच सरकारी हस्तक्षेप मोडून काढण्यातही त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे आयसीसीने म्हटले आहे. या कारवाईमुळे आयसीसीकडून कोणताही निधी मिळणार नाही. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत झिम्बाब्वे क्रिकेट संघाला सहभागी होता येणार नाही. ऑक्टोबरमध्ये टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेच्या सहभागाबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. खेळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवले पाहिजे. कोणत्याही सदस्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय गंभीर आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या घटनेचे उल्लंघन केले आहे. ते अनियंत्रित पद्धतीने कायम ठेवण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: