Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

सिंधूचे ‘सुवर्ण’ हुकले, यामागुचीकडून पराभूत
ऐक्य समूह
Monday, July 22, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: sp2
5जकार्ता, दि. 21 (वृत्तसेवा) : भारताची अग्रनामांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचे इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेचे सुवर्ण पदक हुकले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा लागला. यामागुचीने सिंधूचा 15-21, 16-21, असा पराभव केला. सिंधूने हा मुकाबला अवघ्या 51 मिनिटांमध्ये गमावला. जगातील क्रमांक 4 ची बॅडमिंटनपटू यामागुचा बीडब्ल्यूएफ दौर्‍यात सिंधू विरुद्धचा हा पाचवा विजय आहे. यापूर्वी दोघी 14 वेळा आमनेसामने आल्या. यात सिंधू 10-4 अशी आघाडीवर होती.
मुकाबल्याच्या सुरुवातीला सिंधूने आक्रमकपणा दाखवत लढतीवर आपली हुकुमत राखली. मात्र, नंतर ती यामागुचीच्या स्मॅशना उत्तर देऊ शकली नाही. यामागुचीने फोरहँड स्मॅशद्वारे ही लढत आपल्या बाजूने वळवली. सिंधूने काही चुकाही केल्या. शिवाय आघाडी मिळवण्याच्या अनेक संधीही गमावल्या. आपल्या आक्रमक खेळाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचून पुन्हा एकदा सिंधूच्या हातून हा विजय निसटला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: