Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस मी कधीही तयार : ऋषभ पंत
ऐक्य समूह
Monday, July 29, 2019 AT 11:32 AM (IST)
Tags: sp2
5नवी  दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : विश्‍वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ आता आपल्या आगामी दौर्‍यासाठी सज्ज झाला आहे. 3 ऑगस्टपासून भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौर्‍याला सुरुवात होणार आहे. या दौर्‍यात भारतीय संघ 3 टी-20, 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. मात्र नवीन दौर्‍यापूर्वीही भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्‍न सुटलेला नाही. विश्‍वचषक स्पर्धेत फलंदाजीच्या क्रमावरुन मोठे रामायण घडले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला त्याचा फटकाही बसला. मात्र महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात जागा मिळालेल्या यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.
मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाहीये. यापूर्वीही मी आयपीएमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो आहे. मी या जागेसाठी सरावही करत आहे. मी कोणत्याही एका शैलीत खेळत नाही. सामन्याची गरज असेल तसे खेळण्याचा माझा प्रयत्न असतो. लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मला काहीही फरक पडत नाही. मी वर्तमानपत्र फारसे वाचत नाही.
एकदिवसीय, टी-20 की कसोटी याबद्दल मी फारसा विचार करत नाही. मी कसोटी क्रिकेट यापूर्वी खेळल्यामुळे मला याचा थोडा फायदा मिळतोय. कसोटी क्रिकेट हा खडतर प्रकार मानला जातो. पण यामुळेच मी डावाला आकार कसा द्यायचा, परिस्थितीनुरुप कसे खेळायचे हे शिकलो. कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन शिकायला मिळते. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये गोष्टी पटापट घडत जातात. त्यामुळे तुम्हाला फारसा वेळ मिळत नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: