Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

एकतर्फी सामन्यात मेरी कोमची बाजी
ऐक्य समूह
Monday, July 29, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: sp1
5इंडोनेशिया, दि. 28 (वृत्तसंस्था) : इंडोनेशियातील लाबुआन भागात सुरु असलेल्या मानाच्या झीशीळवशपीं र्उीि स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट महिला बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 51 किलो वजनी गटात मेरी कोमने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी एप्रिल फ्रेंक्सचा 5-0 च्या फरकाने पराभव केला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता, मेरी कोमने ठराविक स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही मेरी सहभागी झाली नव्हती.
मात्र 21 सप्टेंबरपासून सुरु होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेआधी सराव म्हणून मेरी कोमने झीशीळवशपीं र्उीि स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला, आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरीने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: