Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस जाळ्यात
ऐक्य समूह
Thursday, August 01, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 31 : दाखल गुन्ह्यात फिर्यादीला मदत करण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना वडूज पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक सुरेश गुलाब हांगे, रा. पळशी, ता. माण याला एसीबीने ताब्यात घेतले आहे.
म्हासुर्णे, ता.खटाव येथील एका व्यक्तीला त्याच्या सुनेने दाखल केलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी हांगे याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी केली. त्यात हांगे तीन हजाराची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला एसीबीने बुधवारी सकाळी साडे अकराच्या समारास ताब्यात घेतले आहे.
त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास एसीबीचे डीवायएसपी अशोक शिर्के करत आहेत. ही कारवाई डीवायएसपी अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साळुंखे, राजे, अडसूळ, ताटे, कर्णे, अडागळे, खरात, काटकर, भोसले यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: