Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भुईंज येथे बालिकेवर बलात्कार
ऐक्य समूह
Wednesday, August 07, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: re2
5भुईंज, दि. 6 : जीवे मारण्याची धमकी देत व अज्ञानपणाचा फायदा घेत 15 वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना भुईर्ंज येथे घडली असून या प्रकरणी नराधमासह मदत करणार्‍या दाम्पत्यावर पोक्सो अंतर्गत कारवाईची मागणी होत आहे.
याबाबत भुईंज पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी, की मूळचे देगाव, ता. वाई येथील नवबौद्ध समाजाचे एक गरीब कुटुंब मुलीच्या शिक्षणासाठी भुईंज येथे भाडोत्री खोली घेऊन वास्तव्यास होते.
गरिबी व आर्थिक चणचण भासणार्‍या या कुटुंबाने शेजारी राहणार्‍या संशयित आरोपी महंमद जैन्नुद्दीन मोमीन याच्याकडे पीडित मुलीच्या वडिलांनी 200 रूपये उसणे मागितले होते. त्यावर त्याने पीडित मुलीला आपल्या चिकनच्या दुकानातील नोकर किरण भोंडवे याच्या खोलीवर पाठवून देण्यास सांगितले. सदर मुलगी बराच वेळ न आल्याने मुलीच्या आईने विचारणा केली असता वडिलांनी आपण तिला पैसे आणण्यासाठी पाठविले आहे. त्यावर पीडित मुलीची आई किरण भोंडवे याच्या खोलीवर पोहोचली असता. खोलीला बाहेरून कुलूप लावलेले दिसले. परंतु मुलीची चप्पल दरवाज्याच्या बाहेर तिला दिसून आल्याने तिने मोठमोठ्याने हाका मारण्यास सुरूवात केली. त्यावेळी आतून मम्मी मला वाचव, दरवाजा लवकर उघड असा आवाज आला. तदनंतर इतरांच्या मदतीने पीडित मुलीच्या आईने  दरवाजाचे कुलूप तोडून मुलीला बाहेर काढले. परंतु या दरम्यान सदर नराधम महंमद हा खिडकीतून पळून गेला. घडलेल्या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्याला भोंडवे पती-पत्नी यांनी घरात कोंडून बाहेरून कुलूप लावले. नंतर आरोपीने माझ्यावर बलात्कार केला.
यापूर्वी दोन महिन्यापूर्वी बलात्कार केल्याचे पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या फियादित म्हटले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि श्याम बुवा व पीएसआय दुर्गानाथ साळी यांनी आरोपीस तत्काळ अटक करून मदत करणार्‍या किरण जालिंदर भोंडवे व त्याची पत्नी शुभांगी किरण भोंडवे यांनाही ताब्यात घेवून पोक्सो अंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके स्वतः करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: