Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, August 09, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 8 : विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळू रंगनाथ शिंदे (वय 30) मूळ रा. मुंगेवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर सध्या रा. रहिमतपूर यांना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रहिमतपूर  गावच्या शिवारामध्ये झाडाची फांदी तोडताना इलेक्ट्रिक वायर तुटून त्यांना विजेचा धक्का बसल्याने उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: