Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पर्यटकांनी महाबळेश्‍वर येथे पर्यटनाचा आनंद लुटावा
ऐक्य समूह
Saturday, August 10, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: re1
5महाबळेश्‍वर, दि. 9 ः महाबळेश्‍वर येथे पावसाचा जोर कमी झाला आहे. महाबळेश्‍वरकडे येणारे सर्व रस्ते खुले झाले असून ते सुरक्षित आहेत. पर्यटकांसाठी येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. सहलीसाठी महाबळेश्‍वर सुरक्षित आहे. महाबळेश्‍वर बंद नाही. त्यामुळे पर्यटकांनी महाबळेश्‍वर येथे पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन येथील विविध संघटनांनी केले आहे.
गेले 2 आठवडे येथे मुसळधार पाऊस सुरु होता. रोज 10 ते 14 इंच पाऊस पडत होता. हे सर्व पाणी कोयनेसह अनेक धरणातून सोडावे लागले होते.
महाबळेश्‍वर हे उंचावर असल्याने येथे कितीही पाऊस झाला तरी येथे पाणी साचत नाही. त्यामुळे पाण्यापासून येथे कोणताही धोका नाही. प्रचंड पावसातही अपवाद वगळता महाबळेश्‍वरकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले आहेत. हे सर्व रस्ते सुरक्षित असल्यानेे वाहनांसाठी धोका नाही. प्रत्येक सुट्टीला येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक सहलीसाठी येथे येतात व आनंद लुटून परत जातात. असे असताना 4 दिवसांपासून सोशल मीडियावरून महबळेश्‍वर बंद असल्याचे चुकीचे संदेश फिरत आहेत. अनेक पर्यटकांनी येथे हॉटेलमध्ये रुम आरक्षित केल्या आहेत. सोशल मीडियावरून ज्या अफवा पसरत आहेत. त्यावर कोणी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: