Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अरुण जेटली एम्समध्ये दाखल; प्रकृती स्थिर
ऐक्य समूह
Saturday, August 10, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना वैद्यकीय चाचण्यांसाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्‍वसनाचाही त्रास होत असल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती बरी नाही. आज त्यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सकाळी 11 वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
थकवा, श्‍वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आले होते. प्रकृतीच्या कारणास्तव जेटली यांनी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दर्शविला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तशी चिठ्ठीच लिहिली होती. 
गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे. त्यामुळे मला मंत्री बनविण्याचा विचार करू नका, असे या पत्रात नमूद केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओब बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री हर्षवर्धन, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: