Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चार राज्यात पावसाचे 190 हून अधिक बळी
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: na1
5नवी  दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि केरळला मुसळधार पाऊस आणि पुराचा तडाखा बसला आहे. या राज्यांमध्ये 190 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात 40, गुजरातमध्ये 22, कर्नाटकमध्ये 60 तर केरळमधील मृतांचा आकडा 68 वर पोहोचला आहे. कोझीकोड येथे चार आणि थ्रीसूरमध्ये शनिवारी तिघांचा मत्यू झाला आहे. वायनाड जिल्ह्यात 9 आणि कवलापारा येथे 6 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर पुथुमला येथील नऊ जण अद्याप बेपत्ता आहेत.  हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे लष्कराच्या बचाव पथकांना मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कर्नाटकमध्ये आलेल्या पुरात मृतांची संख्या 24 वरून 35 वर पोहोचली आहे. हवामान विभागाने कर्नाटकच्या समुद्र किनार्‍यावरील सात जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढच्या 48 तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: