Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाठीत चाकू मारल्याने एकजण जखमी
ऐक्य समूह
Tuesday, August 13, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 12 :  येथील महामार्गावर वेण्णा पुलाच्या पुढे अज्ञात इसमाने एकाच्या पाठीत चाकू मारल्याने त्यात तो जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की इमानखान आयाजखान पठाण (वय 22), रा. मेहकर, जि. बुलढाणा याच्या पाठीत रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा नजीक वेण्णा पुलाच्या जवळ असणार्‍या कॅनोलनजीक अज्ञात इसमाने चाकू मारल्यामुळे त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: