Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विशाखापट्टणममध्ये जहाजाला आग; 1 बेपत्ता
ऐक्य समूह
Tuesday, August 13, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: mn2
5विशाखापट्टणम, दि. 12 (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता समुद्र किनार्‍याजवळ तटरक्षक दलाच्या एका जहाजाला आग लागली. जहाजावर 29 कर्मचारी होते. त्यांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. एक जण बेपत्ता आहे.
ऑफशोअर सपोर्ट जहाज कोस्टल जॅग्वारला आग लागताच तटरक्षक दलाने वेगाने बचावकार्य सुरू केले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तटरक्षक दलाच्या एका बेपत्ता जवानाचा शोध सुरू आहे. घटनेची चौकशी सुरू आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: