Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डी. एस. कुलकर्णी यांच्या भावाला अटक
ऐक्य समूह
Wednesday, August 14, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: mn4
5पुणे, दि. 13 (प्रतिनिधी) : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सुमारे अडीच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची किमान 230 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कुलकर्णी बंधूंवर आहे. ‘डीएसके’ कंपनीत मकरंद कुलकर्णी हे प्रवर्तक आहेत. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.  
पोलीस मकरंद कुलकर्णी यांचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. पण ते सापडत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात ‘लुकआऊट नोटीस’ काढण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास अमेरिकेला पळून जाताना त्यांना पकडण्यात आले. पुणे पोलिसांचे पथक त्यांना घेऊन जाण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: