Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा जिल्ह्यातील पूरबाधितांना मदत म्हणून रोख पाच हजार
ऐक्य समूह
Wednesday, August 14, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 13 : राज्यातील काही भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर केली होती. त्यानुसार आज कराड तालुक्यातील तांबवे गावापासून रोख पाच हजार रुपये देण्याची सुरुवात करण्यात आली.
 जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित कुटुंबांना पाच हजार रुपये रकमेचे वाटप प्रांताधिकारी हिंमतराव खराडे व तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.  उर्वरित रक्कम बाधित कुटुंबीयांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
गावातील समद मणेर, सरुबाई कोळे, प्रकाश सुतार, बाळासाहेब सुतार, दुलेखान मणेर, रेहाना मणेर, रघुनाथ साठे, भगवान साठे, जयसिंग साठे, सुभाष मदने यांना मंडलाधिकारी नविंद्र भांदिर्गे, तलाठी जी.एच. दराडे, ग्रामसेवक टी. एल चव्हाण, सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, पोलीस पाटील पवन गुरव, आबासाहेब पाटील,आनंदराव ताटे आदींच्या  उपस्थितीत मदतीचे वाटप करण्यात आले.
कराड तालुक्यात मंडळ निहाय मदतीचे वाटप करण्यात आले. कराड, कोपर्डे, इंदोली, उंब्रज, कराड, कवठे, काले,  कोळे, मलकापूर, येळगाव, शेणोली, सुपने, सैदापूर इत्यादी गावातील एकूण 1 हजार 360 कुटुंबांना मदत करण्यात येणार असून त्यामधील व्यक्तींची संख्या 5 हजार 955 आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: