Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांवर
ऐक्य समूह
Wednesday, August 14, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: re1
5पाटण, दि. 13 :  पावसाचा जोर मंदावला असला तरी भविष्यात येणारा पाऊस आणि पूर्वेकडे कोयना नदी पात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेऊन धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांवरून कमी करून आता 3 फूटांवर स्थिर करण्यात आले आहेत.
धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 25 हजार 287 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणातून पूर्वेकडे कोयना नदी पात्रात प्रतिसेकंद 27 हजार 265 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. येणार्‍या पाण्यापेक्षा सोडण्यात येणार्‍या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने धरणातील एकूण पाणीसाठ्यात घट होत आहे. धरणात आता एकूण 101.35 टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा 96.35 टीएमसी इतका झाला आहे. आगामी काळातील पाऊस व येणारे पाणी याचा विचार करून याप्रकारे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: