Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुषमाजींनी ‘प्रोटोकॉल’ला ‘पिपल्स कॉल’मध्ये बदलले : मोदी
ऐक्य समूह
Wednesday, August 14, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: na4
5नवी  दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री असताना देश-विदेशात अडकलेल्या लोकांची तातडीने मदत केली. लोकांच्या संकटात त्या उभ्या राहिल्या. त्यांनी ‘प्रोटोकॉल’शी संबंधित असलेल्या परराष्ट्र खात्याची परिभाषा बदलत ‘प्रोटोकॉल’चं ‘पिपल्स कॉल’मध्ये रूपांतर केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. स्वराज यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येकाला मदत केली. ज्यांनी ज्यांनी मदत मागितली त्यांच्यापाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी ट्विटरवर आलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेत त्याचाही निपटारा केला, असे मोदी म्हणाले.
त्यांना जे खातं मिळालं, त्या खात्याची कार्यसंस्कृती त्यांनी पूर्णपणे बदलून टाकली. परराष्ट्र मंत्रालयाचा नेहमीच प्रोटोकॉलशी संबंध जोडला जातो. मात्र, सुषमाजींनी एक पाऊल पुढे टाकत या प्रोटोकॉल खात्याचं पिपल्स कॉलमध्ये रूपांतर केलं. परराष्ट्र मंत्रालयही त्यांनी लोकांशी जोडलं, असे मोदी म्हणाले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: