Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा
ऐक्य समूह
Friday, August 30, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 29 : येथील यादोगोपाळ पेठेतील धीरज कासट अँड कंपनीतील संगणकावर तुमच्या संगणकातील सर्व फाईल्स इनकरप्ट केल्याचा मेसेज एका अज्ञाताने पाठवला तसेच मालवेअरचा हल्ला करून संगणकातील हॅक केलेला डाटा परत देण्यासाठी बिटकॉईन करन्सी स्वरूपात खंडणी मागितल्या प्रकरणी त्या अज्ञात हॅकरवर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सायबर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, दि. 26 रोजी येथील यादोगोपाळ पेठेतील विमल विहार अपार्टमेंटमध्ये असलेल्या धीरज कासट अँड कंपनीच्या कार्यालयातील संगणकावर अज्ञात आरोपीने ऑल ऑफ युवर फाईल्स आर इनकरप्टेड असा मेसेज पाठवला. त्यानंतर त्याने रॅन्समवेअर मालवेअरचा अ‍ॅटॅक करून संगणकामधील सर्व डाटा हॅक केला.
हा सर्व प्रकार गोंधळात टाकत असतानाच त्या हॅकरने धीरज कासट यांना हॅक केलेला डाटा परत करण्यासाठी बिटकॉईन करन्सी स्वरूपातील पैशांची खंडणी मेसेज  करून मागितली. ती खंडणी न दिल्यास संपूर्ण डाटा नष्ट करू तसेच डाट़्याचा गैरवापर करू अशी धमकीही दिली असल्याची तक्रार धीरज राजेंद्र कासट, वय 35, रा. 137, भवानी पेठ, सातारा यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस निरीक्षक उमेश हजारे या सायबर क्राइमचा अधिक तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: