Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाई, जावलीतील शेतकर्‍यांची 45 लाखांची फसवणूक
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: re1
5वाई, दि. 9 ः इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. या कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन प्रकरणी वाई व जावली तालुक्यातील शेतकर्‍यांची 44 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वाई तालुक्यातील शेतकर्‍यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते व सहसंचालक संदीप सुभाष मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाई तालुक्यातील मोतीबाग वाई येथील सुनील नायकवडी यांनी 4 लाख 50 हजार, विलास नायकवडी (शहाबाग) यांनी 2 लाख, रुपक शेवते (शहाबाग) 7 लाख 20 हजार, अमित ननावरे (बावधन) यांनी 2 लाख 3 हजार, मयूर ननावरे (मोतीबाग) यांनी 60 हजार, अमोल जमदाडे (शांतीनगर) यांनी 1 लाख, संदेश जमदाडे (शांतीनगर) यांनी 1 लाख 33 हजार, अरुण गायकवाड (ओझर्डे) यांनी 1 लाख 20 हजार, जय ननावरे (कवठे) यांनी 1 लाख असे एकूण 20 लाख 86 हजार रुपये वेळोवेळी कडकनाथ कोंबडी पालनासाठी महारयत अ‍ॅग्रो इंडियामध्ये भरले होते. तर जावली तालुक्यातील सनी धुमाळ (सरताळे) यांनी 1 लाख 5 हजार, चेतन गायकवाड (सरताळे) यांनी 1 लाख 33 हजार, वसीम डांगे (कुडाळ), 1 लाख 33 हजार, अभिजित तरडे (बामणोली) 2 लाख 50 हजार, हणमंत पवार (महिगाव) यांनी 75 हजार, महेश महामुलकर (महामुलकरवाडी) 75 हजार, प्रवीण गुजर (पानस) 75 हजार, संतोष भिलारे (अमृतवाडी) 5 लाख, सतीश पवार (आलेवाडी) यांनी 2 लाख 50 हजार, नलिनी दळवी (म्हाते खुर्द) 1 लाख रुपये असे वाई व जावली तालुक्यातील शेतकर्‍यांची एकूण 44 लाख 57 हजार रुपये कंपनीत भरले आहेत. त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची तक्रार वाईतील शेतकर्‍यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: