Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे दरवाजे पाच फुटांवर
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 11:20 AM (IST)
Tags: re4
5पाटण, दि. 9 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटावरून कमी करून ते आता पाच फुटांवर आणण्यात आले आहेत. सध्या या दरवाजातून विनावापर 43 हजार 481 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2 हजार 100 असे एकूण 45 हजार 681 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्याची समानता राखण्यासाठी जेवढे पाणी जलाशयात येत नाही तेवढे पाणी नदीपात्रात सोडून दिले जात आहे. जर पावसाचा जोर याहीपेक्षा कमी झाला तर सोडण्यात येणारा विसर्गही त्याच प्रमाणात कमी करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. सध्या कोयना धरणात 103.19 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 98.19 टीएमसी इतका आहे. पाण्याची उंची 2161 फूट 11 इंच इतकी झाली आहे.
सोमवार, दि. 9 रोजी सायंकाळी 6 पर्यंत कोयनानगर येथे 51 (6580), नवजा 53 (7617), महाबळेश्‍वर 55 (6647) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर कोयना धरणाच्या अतिपर्जन्यवृष्टी पडणार्‍या क्षेत्रातील प्रतापगड येथे 57 (6200), सोनाट 23 (5509), वळवण 61 (7266), बामणोली 29 (4467) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने मोरणा विभागाला जोडणारा नेरळे पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.  
मूळगाव पुलावर अद्याप पाणी असल्याने तो दळणवळणासाठी बंदच आहे. ग्रामस्थ व युवक मात्र  आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून ये-जा करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: