Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अट्टल घरफोड्याकडून दागिने, टीव्ही जप्त
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 9 : येथील मतकर कॉलनीत झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती. त्याच्याकडून सुमारे 50 हजार रुपयांचे दागिने व टीव्ही जप्त करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. या संशयिताकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येतील, असा विश्‍वास पो.नि. मुगुटराव पाटील यांनी व्यक्त केला. दशरथ रामदास कोळी, (वय 25) रा. भवानी पेठ, घोंगदे वस्ती, सोलापूर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून महिन्यात मतकर कॉलनीत झालेल्या घरफोडीत टीव्ही, सोन्याचे दागिने व इतर ऐवज चोरीस गेला होता. यामध्ये तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील दशरथ कोळी हा पोलिसांना मिळून येत नव्हता. सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तडवी, फडतरे, कुंभार, माने,  पवार, अजित माने, काशीद यांनी कोळी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून टीव्ही, सुमारे 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. कोळी याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पो.नि. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: