Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचे पाकिस्तानला सणसणीत उत्तर
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: na1
5जिनिव्हा, दि. 10 (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारी परिषदेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्‍या पाकिस्तानला भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत असून भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशीर पाऊल उचलले आहे, असे विजय ठाकूर सिंह यांनी सांगितले.
सामाजिक, आर्थिक समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी माझे सरकार प्रगतीशील धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे  विजय ठाकूर सिंह यांनी सांगितले. भारत आपल्या अंतर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही हे भारताने स्पष्ट केले. पाकिस्तान खोटे आरोप करत असून प्रदेशातील जनतेच्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने जम्मू-काश्मीरचे नुकसान केल्याकडे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. पाकिस्तान दहशतवादाचे प्रमुख केंद्र असल्याचेही भारताने निक्षून सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: