Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिरवळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत
ऐक्य समूह
Monday, September 16, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: re3
5शिरवळ, दि. 15 :  मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच प्रथम शिरवळ नगरीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा शिरवळमध्ये दाखल होताच मुख्यमंत्र्यांच्या जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी  भर पावसात मुख्यमंत्री उपस्थित शिरवळकरांना संबोधित करताना म्हणाले, की शिरवळकरांनो तुमच्याबरोबरच वरूणराजाने देखील आमचे स्वागत करून आम्हाला आशीर्वाद दिला आहे.
आमचे सरकार गेली पाच वर्षे केलेली कामे सांगण्यासाठी प्रथमच प्रत्येक ठिकाणी जाऊन जनतेला संबोधित करत आहे. तसेच राहिलेले असेन ते समजावून घेण्यासाठी आज सातारा जिल्ह्यात महाजनादेश यात्रा घेऊन आलो आहे आणि पुन्हा एकदा जनआशीर्वाद व जनाआदेश मागत आहे. गेल्या पाच वर्षांत रखडलेली सर्व कामे मग ती रस्त्यांचे असो, रेल्वेचे असो किंवा प्रकल्पांची असोत सर्व कामे मार्गी लावण्याचे काम या सरकारने केले आहे आणि इथून पुढेही अशीच कामे मार्गी लावण्यासाठी तुम्ही मोदीजींच्या, माझ्या, चंद्रकांत दादांच्या, मदन दादांच्या पाठीशी आहात असा आशीर्वाद जनादेश समजून आम्ही मुंबईला परत जाऊन येणार्‍या विधानसभेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकणार आहे. आणि पुन्हा याच ठिकाणी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी परत येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी  कांताताई नलावडे, सातारा जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, शिरवळच्या सरपंच लक्ष्मीताई पानसरे, खंडाळा तालुका अध्यक्ष राहुल हाडके, प्रकाश बापू देशमुख, दीपाली घोडके, सुनील गायकवाड, सागर पानसरे, कौशिक जोशी, नायगावचे सरपंच निखिल झगडे, ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, शिरवळ शहराध्यक्ष नीळकंठ भुतकर, सातारा अल्पसंख्याक अध्यक्ष अरिफभाई सय्यद, उमाकांत राठी, शुभम गुजर, इमरान काजी, बंडू भिसे, सतीश राऊत, राजेंद्र मगर आदी मान्यवरांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, गेले चार पाच दिवसापासून महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होती. ज्या खड्ड्यात शिरवळ परिसरातील नागरिकांनी अख्खा पावसाळा काढला तेच रस्ते मात्र दोनच दिवसात डागडुजी करून सज्ज करण्यात आले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: