Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रेल्वे कर्मचार्‍याची बुलेट पेटवली
vasudeo kulkarni
Tuesday, September 17, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 16 : सातारा रेल्वे स्थानकासमोरील आरपीएफ बॅरेकसमोर शेडमध्ये पार्क केलेली बुलेट अज्ञाताने पेटवून दिल्याने यामध्ये बुलेटचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार रेल्वे कर्मचारी अब्राउद्दीन ईब्राहिम बागवान (वय 48), रा. आरपीएफ बॅरेक, रेल्वे स्थानकासमोर, माहुली, सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अब्राउद्दीन बागवान हे रेल्वेचे कर्मचारी असून दि. 15 रोजी रात्री पावणेतीनच्या सुमारास अज्ञाताने त्यांची शेडमध्ये पार्क केलेली बुलेट क्रमांक (एम. एच. 12, क्यु. एच. 2037) पेटवून दिली. या घटनेत बुलेटचे वायरिंग  तसेच सीट जळून खाक झाल्याने 15 हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. सहाय्यक फौजदार घाडगे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: