Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंगल कार्यालयात दमदाटी प्रकरणी चार जणांवर प्रतिबंधक कारवाई
ऐक्य समूह
Tuesday, September 17, 2019 AT 10:55 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 16 : येथील गजानन मंगल कार्यालयात मालक व कामगारात झालेल्या पगार व कामाच्या वादातून दोन्ही बाजूने परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे हवालदार माने यांनी चार जणांवर प्रतिबंधक कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 15 रोजी सायं. 7.30 वाजण्याच्या सुमारास गजानन मंगल कार्यालयात रुक्साना राजू शेख (वय 40), रा. कब्रस्थानसमोर, गेंडामाळ, सातारा या त्यांचा दोन महिन्यापासून राहिलेला पगार मागण्यासाठी गेल्या असता तिथे कार्यालयाचे मालक कौशिक कुलकर्णी (वय 35) व अभिषेक कुलकर्णी (वय 30), दोघे रा. गजानन मंगल कार्यालयाशेजारी, सातारा यांनी शेख यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार दिली.
तर पल्लवी संजीव कुलकर्णी (वय 50), रा. शनिवार पेठ, सातारा यांनी रुक्साना राजू शेख व हिना (पूर्ण नाव माहिती नाही) या दोघींनी मंगल कार्यालयात दुसरे कामगार का ठेवले असे म्हणत तेथील कामगार जगन्नाथ व मोनाली यांना मारहाण केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर हवालदार माने यांनी रुक्साना शेख, कौशिक कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी, हिना यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: