Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बारामती व कराड जिल्हा निर्मितीचा डाव मी उधळला : श्री. छ. उदयनराजे
ऐक्य समूह
Tuesday, September 17, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 16 : सातारा जिल्ह्याचे विभाजन करून बारामती आणि कराड जिल्हा निर्माण करण्याचा डाव चालला होता. सातारा जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे. अशा जिल्ह्याची ओळख पुसण्याचा डाव माझ्यामुळे उधळला. नाही तर सातारा जिल्हा संपुष्टात आला असता असा आरोप माजी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला. मी कधीही द्वेषापोटी राजकारण केले नाही, तर विषय घेवून मी बोलत आलो असेही त्यांनी सांगितले.
कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी श्री. छ. उदयनराजे म्हणाले, भारतामध्ये लोकशाही शासनव्यवस्था आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण असो किंवा इतर कोणीही असो त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल केला तरी आपणास काही फरक पडत नाही.1968 साली सातारा शहराची हद्दवाढ झाली होती. आता लोकांची संख्या वाढली असून त्यांच्या सोयीसाठी हद्दवाढ करणे गरजेचे आहे. यापूर्वी मी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हद्दवाढीचा प्रश्‍न मांडला होता. कृषी महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आणि मेडिकल कॉलेज हे प्रश्‍न मांडले होते. त्यावर त्यांनी काही निर्णय घेतला नाही. पंतप्रधान कार्यालयात पृथ्वीराज बाबा होते. त्यांच्या संपर्काने ही कामे झाली असती. मात्र का झाली नाहीत ते मी सांगू शकत नाही. मी कधीच बेशिस्त नव्हतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. माझ्या स्टाईलवर बोलणे चुकीचे आहे. आजपर्यंत जेवढे भ्रष्टाचार झाले आहेत, त्यावर का बोलत नाहीत? तो बेशिस्तपणा नाही का असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: