Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘जैश’ची बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी
ऐक्य समूह
Tuesday, September 17, 2019 AT 10:51 AM (IST)
Tags: mn2
8 ऑक्टोबरपर्यंत सहा राज्यातील मंदिरांमध्ये बॉम्बस्फोट करणार
5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : मुंबईसह देशातील सात रेल्वे स्थानके आणि सहा राज्यातील मंदिरामध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे. हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानक अधिकार्‍यांना ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात 8 ऑक्टोबरपर्यंत सहा राज्यातील मंदिरांमध्ये स्फोट करणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान भारतात अतिरेकी कारवाया करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची गुपचूप तुरूंगातून सुटका   केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. गेल्या महिन्यात गुजरातमधील कच्छमध्ये एक संशयित बोट लष्कराला सापडली होती. त्यानंतर नौदल प्रमुखांनीही समुद्र मार्गाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानकातील अधिकार्‍यांना ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. रोहतक रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार हे पत्र रोहतक रेल्वे जंक्शन अधीक्षकांच्या नावे पाठवण्यात आले आहे. स्थानक व्यवस्थापकांना शनिवारी 3 वाजता हे पत्र मिळाले. हे पत्र मसूद अहमद याने पाकिस्तानमधील कराचीतून पाठविले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पत्रात 8 ऑक्टोबरपर्यंत देशातील सहा राज्यातील मंदिरे आणि रेल्वे स्थानकांमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यात मुंबईसह रोहतक, हिसार, चेन्नई, जयपूर, भोपाळ आणि कोटा या रेल्वे स्थानकांचा उल्लेख करण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: