Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोदींसाठी एअरस्पेस देण्यास पाकचा नकार
ऐक्य समूह
Thursday, September 19, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाकिस्तानने त्यांच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्यास मनाई केल्याची घटना ताजी असतानाच पाकने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एअरस्पेस देण्यास नकार दिला आहे. मोदींना आमच्या हवाई हद्दीतून प्रवास करू देणार नाही. तसे आम्ही भारतीय उच्चायुक्तांना कळवले आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या या कुरापतीमुळे भारत आणि पाक दरम्यान आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.    
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. 27 सप्टेंबरपर्यंत हा दौरा आहे. त्यासाठी 21 सप्टेंबर रोजी मोदी भारतातून अमेरिकेसाठी प्रयाण करतील. अमेरिकेला जाण्यासाठी पाकिस्तान मार्गे जावे लागणार असल्याने पाकिस्तानने मोदींच्या विमानासाठी एअरस्पेस देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर जागतिक स्तरावरही एकटं पडावं लागल्याने पाकिस्तानने आता कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच त्यांनी आधी राष्ट्रपती कोविंद आणि आता मोदींना त्यांच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्यास मनाई केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: