Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मनवचा युवक अपघातात ठार
ऐक्य समूह
Thursday, September 19, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि.18: ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मुनावळे फाटा येथे सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल भास्कर गवरे (वय 24 वर्षे), रा.मनव, ता.कराड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, बुधवार, दि.18 सकाळी पावणे दहाच्या सुमारास राहुल गवरे हा दुचाकीस्वार पाचवड फाट्याच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी मुनावळे फाट्यावर तो आला असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार हा लांब फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. 
अपघात झाल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन राहुलला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, राहुलचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: