Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चिदंबरम यांच्या कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ
ऐक्य समूह
Friday, September 20, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 19 (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आजही कोर्टात दिलासा मिळाला नाही. चिदंबरम यांना येथील राउज एव्हेन्यू संकुलातील कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी 21 ऑगस्ट रोजी नाट्यमय घडामोडींनंतर पी. चिदंबरम यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात प्रकट होत आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा केला होता. घरी पोहोचल्यानंतर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश घेत त्यांना अटक केली होती. त्यानंतर आधी 26 ऑगस्टपर्यंत व नंतर 30 ऑगस्ट, त्यानंतर 2 सप्टेंबर व 19 सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 
आज कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना राउज एव्हेन्यू संकुलातील कोर्टात हजर करण्यात आले होते. तिथे त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
                 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: