Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘तेजस’ विमानातून संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं उड्डाण
ऐक्य समूह
Friday, September 20, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: na2
5बेंगळुरू, (वृत्तसंस्था) दि. 19 :  स्वदेशी बनावटीच्या हलक्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून आज, गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केलं. तेजसमधून उड्डाण करणारे ते देशातील पहिले संरक्षण मंत्री आहेत, असं अधिकार्‍यांनी सांगितलं. राजनाथ सिंह यांनी अर्धा तास विमानात घालवला. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने तेजसची निर्मिती केली आहे  तर डीआरडीओच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीनं तेजसचे डिझाइन केले आहे.
तेजस हवेतून हवेत तसेच हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्राचा मारा करू शकते. यामध्ये बॉम्ब आणि रॉकेटही वापण्याची सुविधा आहे. 42 टक्के कार्बन फायबर, 43 टक्के  अ‍ॅल्युमिनियम आणि टायटेनियम या धातूपासून तेजसची बांधणी करण्यात आली आहे. तेजसमध्ये केवळ एकच पायलट बसू शकतो तर प्रशिक्षणासाठी असलेल्या तेजसमध्ये दोन सीटची सुविधा आहे. विशेष म्हणजे जमिनीपासून 54 हजार उंचीपर्यंत तेजस उड्डाण करू शकते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: