Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 20 (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर व्हायला विलंब लागत असल्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये विशेषतः विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. 2014 मध्ये 12 सप्टेंबर रोजी निवडणुकीची तारीख जाहीर होऊन राज्यात आचारसंहिता लागू झाली होती.
मात्र, 2014 मधील निवडणूक जाहीर होण्याची तारीख लक्षात घेतली असता ही तारीख जाहीर व्हायला 10 दिवसांचा विलंब झाला आहे. पंतप्रधानांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता होती. मात्र आजही तारीख जाहीर झालेली नाही. दुसरीकडे राज्य सरकारने गेल्या दोन दिवसात तब्बल 281 निर्णय जारी केले आहेत. यात 18 सप्टेंबर रोजी 122 आणि 19 सप्टेंबर रोजी 159 निर्णयांचा समावेश आहे. आजच्या निर्णयांची संख्या रात्री उशिरा उपलब्ध होणार आहे. आपल्या जवळच्या लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त निर्णय घेता यावेत यासाठी आचारसंहितेच्या तारखा लांबवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जावू लागला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: