Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेअर बाजार 1800 अंकांनी वधारला!
ऐक्य समूह
Saturday, September 21, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: na1
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्स दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी आली आहे. बीएसईचा प्रमुख निर्देशांक 1600 अंकांनी उसळून 37,767.13 वर पोहोचला. गेले काही दिवस शेअर बाजारात आलेली मरगळ अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे दूर झाली. गुंतवणूकदारांनी या उसळीनंतर शुक्रवारी सकाळी शेअर बाजारातून चक्क 2.11 लाख कोटी रुपये कमावले.
वाढलेल्या निर्देशांकामध्ये बँकिंग आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. सेन्सेक्स सर्व 30 शेअर्सच्या उसळीनंतर 1600 अंकांनी वधारला. निफ्टी 11,000 वर पोहोचला. निफ्टीच्या 50 पैकी 49 शेअर्समध्ये तेजी आहे. 
20 मे नंतर बाजारात आलेली ही सर्वात मोठी तेजी आहे. यापूर्वी लोकसभेच्या एक्झिट पोलच्या वेळी शेअर बाजार उसळला होता.
कोट्यवधींची कमाई
शेअर बाजारातील उसळीनंतर इडए च्या यादीतील कंपन्यांचे भांडवल 2,11,086.42 कोटी ते 1,40,79,839.48 कोटींपर्यंत गेले. सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्सपैकी छढझउ वगळता सर्व कंपन्या ग्रीन यादीत गेल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: